Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Marathwada › हंगामी वसतिगृहाच्या झाडाझडतीत अनेक विद्यार्थी गैरहजर

हंगामी वसतिगृहाच्या झाडाझडतीत अनेक विद्यार्थी गैरहजर

Published On: Mar 22 2018 1:42AM | Last Updated: Mar 22 2018 12:10AMकेज : प्रतिनिधी

तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तालुक्यात 51 ठिकाणी हंगामी वसतिगृह चालू करण्यात आलेले आहेत. या वसतिगृहातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरुन शनिवारी ता.17 मार्चला अचानक झाडाझडती घेण्यात आल्याने हंगामी वसतिगृह चालू असलेल्या ठिकाणच्या शिक्षकासह मुख्याध्यापकांची धांदल उडाली होती. अचानक करण्यात आलेल्या तपासणीत अनेक बोगस विद्यार्थ्याचे पितळ उघडे पडले आहे. 

केज गटसाधन केंद्रा अंतर्गत तालुक्यातील 51 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ऊसतोड कामगारांच्या पाल्यासाठी हंगामी वसतिगृह चालू करण्यासाठी जिल्हा परिषदेने मंजुरी दिल्याने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हंगामी वसतिगृह चालू करण्यात आले. मात्र यातील अनेक ठिकाणच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखवण्यासह वसतिगृहातील गैरप्रकार व भ्रष्टाचार उघड करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे यांच्या आदेशावरून केज तालुक्यातील हंगामी वसतिगृहाची अचानक तपासणी करण्यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बोकरे यांनी शुक्रवारी केज पंचायत समितीमध्ये पंचायत समितीच्या कर्मचारी वर्गास रात्री वसतिगृहाची तपासणी करण्यासाठी प्रशिक्षण देत वसतिगृहाची तपासणी करताना काय काय तपासणी करायचे या बाबतीत मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी गुंजकर , गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे उपस्थित होते.