Mon, Apr 22, 2019 12:07होमपेज › Marathwada › पैसे भरून अतिक्रमण केले जातात नियमित

पैसे भरून अतिक्रमण केले जातात नियमित

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 12 2018 12:08AMमाजलगाव : प्रतिनिधी

येथील नगर परिषद हद्दीत असलेली बांधकामे नियमबाह्य व अतिक्रमणाने होत आहेत. त्यांना अभय देण्यासाठी नगर परिषदेने नवीन फंडा काढला आहे. बांधकामातील अवैध पार्किंग बद्दल दंड भरा व मोकळे व्हा असे फर्मान काढून नगरपरिषदेकडून वसुली करण्यात येत असल्याचा प्रकार उघड होत आहे.

येथील नगरपरिषद हद्दीमध्ये अवैध बांधकामांना उत आला आहे. नगरपरिषद क वर्ग असल्याने येथे केवळ तीन मजल्यांनाच परवानगी असताना चक्क चार - पाच - सहा मजली इमारती उभ्या करण्यात येत असून नगरपरिषद अभियंते यांच्या संगणमताने पार्किंग इमारतीत दाखवून तेथे समोरील भागत गाळा सुरू करण्यात आलेले आहेत. पालिका अभियंताच अवैध बांधकामांना कसा मार्ग काढायचा याची शिकवण व पळवाट काढून देत असल्याचे दिसून येत असल्याने नगरपरिषदेत सावळा गोंधळ सुरू आहे. गजानन मंदिर रस्त्यावर पाच - सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे तर बायपास रोडवर व मुख्य रस्त्यावर मोठमोठ्या इमारती नियम पायदळी तुडवून बांधल्या गेल्या आहेत. अभियंत्याच्या संमतीने नगरपरिषदेत नकाशा सादर एक करायचा व बांधकाम दुसरे करायचे ते अवैध परंतु या अवैध बांधकामास अभय देण्यासाठी नगरपरिषदेने त्या बांधकामधारकांकडून अतिक्रमणाचे नावांवर वसुली सुरू केली आहे.

Tags : Marathwada, illegal, work, become, legal, payment