Sun, Aug 25, 2019 23:38होमपेज › Marathwada › परळी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार : धनंजय मुंडे 

‘परळी विधानसभा मतदारसंघातूनच लढणार’

Published On: Jun 07 2018 3:44PM | Last Updated: Jun 07 2018 3:57PMपरळी वैजनाथ  : रविंद्र जोशी

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभेच्या निवडणूकीतून माघार घेणार असल्याच्या मोठ्या प्रमाणावर  बातम्या सोशल मीडियातून व्हायरल झाल्या होत्या. यवतमाळ येथे बोलताना यवतमाळ जिल्ह्यातील वाढीव तीन जागा काँग्रेस कडुन मागणी करताना त्या बदल्यात परळी विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी असल्याचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत परळी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ना. धनंजय मुंडे यांनी आज (दि.७ ) परळीत केली.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी जागा वाटपात  विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दिग्रस व वणी या तीन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी परळीची जागा काँग्रेसला सोडणार असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या होत्या. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर होणाऱ्या चर्चांना धनंजय मुंडे यांनी पूर्णविराम देत काहीही झाले  तरी  परळी विधानसभा मतदारसंघातूनच आपण आमदार होणार असल्याचे ठामपणे सांगत परळी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ना. धनंजय मुंडे यांनी आज (दि.7 ) परळीत केली.

परळी तालुक्यातील मलनाथपुर येथे उभारण्यात आलेल्या ८० मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प लोकार्पण सोहळा प्रसंगी उपस्थित परळी मतदारसंघातील हजारोंच्या जनसमुदायासमोर बोलताना ना. धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.वणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते डॉ., महेंद्र लोढा हे तेथून विधानसभा लढविण्यास इच्छुक असून त्याअनुषंगाने भाषणात आपण वणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस साठी सोडवून घेण्याविषयी बोललो होतो असे सांगून मी परळी काँग्रेस ला सोडणार असल्याच्या बातम्यांनी अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या असा टोला त्यांनी लगावला.