Sat, Jul 20, 2019 23:28होमपेज › Marathwada › पत्नी आणि मुलीला पेटवून पतीची आत्महत्या

पत्नी आणि मुलीला पेटवून पतीची आत्महत्या

Published On: May 09 2018 2:07PM | Last Updated: May 09 2018 2:07PMजळगाव : प्रतिनिधी 

पत्नी व मुलीला जिवंत पेटवून देत पतीनं स्वतः रेल्वेखाली येत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमळनेर येथे घडली. पहाटे ४ च्या सुमारस हा संपूर्ण प्रकार घडला.

अमळनेर येथील प्रताप मिल कम्पाऊंड परिसरामधील हा धक्कादायक प्रकार आहे. सरिता अनिल खैरनार (वय ३३ वर्ष) या महिलेला तिचा पती अनिल खैरनारनं पेट्रोल ओतून पेटवलं. या घटनेत सरिता आणि त्यांची पाच वर्षांची चिमुकली तनुजा गंभीररित्या जखमी झाल्या. यानंतर स्वतः अनिल खैरनारने मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, जखमी मायलेकींना धुळ्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान चिमुकल्या तनुजाचा मृत्यू झाला.  

 

Tags : crime, jalgaon, jalgaon news, husband burn his wife and 5 year old girl