Thu, Aug 22, 2019 10:33होमपेज › Marathwada › स्व. मुंडे यांच्या स्मारकासाठी उपोषण

स्व. मुंडे यांच्या स्मारकासाठी उपोषण

Published On: Jun 03 2018 1:15AM | Last Updated: Jun 02 2018 11:30PMहिंगोली : प्रतिनिधी

लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी औरंगाबाद येथील नियोजित जागा शासकीय दूध डेअरीजवळ शासनाने मंजूर केली आहे, मात्र अद्यापपर्यंत स्मारकासाठी कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसून येत नाही. त्यामुळे या विरोधात जय भगवान महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी (दि.2) लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणाला विविध पदाधिकार्‍यांनी आपला पाठिंबा दर्शवून सहभागी झाले होते.

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ स्मारकासाठी शासनाकडून औरंगाबाद येथे नियोजित जागा देण्यात आली होती. सदरील जागेवर स्मारक उभे करण्याबाबत कोणत्याही प्रकारची अद्यापपर्यंत हालचाल सुरू झालेली दिसून येत नाही. स्मारक व्हावे,  यासाठी मागील तीन वषार्र्ंपासून जय भगवान महासंघाच्या वतीने मागणी होत आहे. तरीसुध्दा आजमितीस स्मारक झाले नाही.

यामुळे  शनिवारी जय भगवान महासंघाच्या वतीने हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही उपोषण करीत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्‍त केला. यावेळी उपोषणाला आमदार रामराव वडकुते, आमदार डॉ.संतोष टारफे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, राम कदम आदींनी आपला पाठिंबा दर्शवून सहभागी झाले होते. उपोषणकत्यार्र्ंत महासंघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, भगवान बांगर, अविनाश बांगर, मनोज बांगर उपस्थित होते.