Wed, Nov 21, 2018 11:47होमपेज › Marathwada › दहशतवाद, जातीयवाद, अनिष्ट परंपरांची होळी !

दहशतवाद, जातीयवाद, अनिष्ट परंपरांची होळी !

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:30AMजाफराबाद : प्रतिनिधी

राजमाता जिजाऊ शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण बचावचा संदेश देत होळीचा सण साजरा केला. यावेळी दहशतवाद, जातीयवाद, अनिष्ट रूढी व परंपरा यांची होळी करण्यात आली. 

 समाजात सुरू असलेल्या अनेक अनिष्ट रूढी व प्रथा याचा नायनाट करण्यासाठी प्रतीकात्मक पोस्टर तयार करून त्याचे दहन करून गुरुवारी होळीचा सण  साजरा केला. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा लहाने होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कोमल खंडेलवाल, सोनाली लोखंडे, किरण जैस्वाल, मुख्याध्यापक सलमान खान उपस्थिती होती.