Sun, May 26, 2019 17:06होमपेज › Marathwada › हॉकीपट्टू एस.टी. डोईफोडे यांचे निधन

हॉकीपट्टू एस.टी. डोईफोडे यांचे निधन

Published On: Apr 07 2018 9:18PM | Last Updated: Apr 07 2018 9:18PMहिंगोली : प्रतिनिधी

उत्कृष्ट हॉकीपट्टू तथा मराठवाडा विद्यापीठाच्या संघात सर्वोत्तम गोलरक्षक  श्रीधर त्र्यंबकराव डोईफोडे (वय, ८६)यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. डोईफोडे यांनी ब्राह्मणसभा स्थापनेपासून महत्वाची धूरा सांभाळली आहे. सध्या ते कोषाध्यक्षपदी होते. तसेच चातुर्मास समिती सचिव पदी, सुंदरलाल सावजी जिंतुर अर्बन बँकेच्या सल्लागार पदावर, स्व. बाबुलाल राठोड सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेमध्ये त्यांचा हिररीने सहभाग असायचा. मराठवाडा विद्यापीठाच्या हॉकी संघामध्ये त्यांची उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून ओळख होती. 

जुन्या पिढीतील सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडू, मेडीकल असोसीएशनच्या सदस्य पदी त्यांनी कार्य केलेले आहे. त्याच प्रमाणे अनेक ठिकाणच्या सार्वजनिक, धार्मिक कामामध्येही हिररीने सहभाग नोंदविला. मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याने औरंगाबाद रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता हिंगोलीत त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांना एस.टी. या टोपन नावानेच ओळखले जात होते.