Fri, Nov 16, 2018 06:35होमपेज › Marathwada › लग्नाच्या तोंडावर पोलिसाची आत्महत्या

लग्नाच्या तोंडावर पोलिसाची आत्महत्या

Published On: Mar 10 2018 12:49PM | Last Updated: Mar 10 2018 2:39PMहिंगोली : प्रतिनिधी

हिंगोली पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या २२ वर्षीय पोलिस कर्मचारी सोपान गणेशराव लिंबेकर याने शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास कळमकोंडा येथील आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

मयत सोपान याचे १४ मार्च रोजी लग्न होणार होते. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. लग्न अवघ्या चार दिवसांवर आले असताना त्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इतर बातम्याः

राज्याच्या बजेटमध्ये कोणत्या क्षेत्राला काय?

फोनच्या बॅटरीसंदर्भातील ‘या’ गोष्टी खोट्या !

आरोग्यः काविळीपासून बचावासाठी...

...अन् छिंदम प्रकरणी पोलिसही आले बुरख्यात!