Mon, May 27, 2019 06:43होमपेज › Marathwada › हिंगोलीत संतप्‍त जमावाने पोलिसांची गाडी पेटविली

हिंगोलीत संतप्‍त जमावाने पोलिसांची गाडी पेटविली

Published On: Jul 24 2018 4:18PM | Last Updated: Jul 24 2018 4:18PMहिंगोली : प्रतिनिधी

मराठा क्रांती ठोक मोर्चाला मंगळवारी हिंसक वळण लागले. काकासाहेब शिंदे या तरूणाच्या मृत्युचे पदसाद जिल्हाभरात उमटले. हिंगोली ते नांदेड रस्त्यावरील खानापूर चित्‍ता या गावाजवळ सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलना दरम्यान संतप्‍त आंदोलकांनी पोलिसांची गाडी पेटवून दिल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी हिंगोली बंदचे आवाहन केले होते. या बंदला जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळाला. हिंगोली शहरासह वसमत, कळमनुरी, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, सेनगाव, कुरूंदा, औंढा नागनाथ, गोरेगाव आदी ठिकाणी आंदोलकांनी कडकडीत बंद पाळून ठिकठिकाणी रास्ता रोको केल्यामुळे सर्व मार्ग बंद झाले होते. दुपारी एकच्या सुमारास हिंगोली तालुक्यातील सावरखेडा, खानापूर चित्‍ता या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करून आंदोलन सुरू असतांना बासंबा पोलिस ठाण्याची जीप क्र.एमएच ३८ जी १८४ दाखल होताच. जीपवर पेट्रोलचा गोळा टाकून पोलिसांचे वाहन पेटविण्यात आले. चालक कांबळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गाडीतून उडी घेत आपला जीव वाचविला.

या आगीत पोलिसांचे वाहन जळून खाक झाले. तसेच हिंगोली, कळमनुरी, वसमत आगारातून सकाळी सहा वाजल्या पासून बसेस सोडण्यात आल्या नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला. दुपारी चार वाजेपर्यंत जिल्हयातील अनेक ठिकाणी कडकडीत बंद सुरूच होता.