Sun, Jul 21, 2019 10:08होमपेज › Marathwada › हिंगोली : कळमनुरीत तरूण शेतकर्‍याची आत्महत्या

हिंगोली : कळमनुरीत तरूण शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Mar 14 2018 7:02PM | Last Updated: Mar 14 2018 7:02PMकळमनुरी : प्रतिनिधी

हिंगोली जिल्‍ह्‍यातल्‍या कळमनुरी येथे 41 वर्षीय तरूण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीला कंटाळून शेतामधील झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दि.14 मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कळमनुरी शहरातील तरूण शेतकरी अनिल विठ्ठलराव गुंजकर (वय 41) वर्ष यांच्याकडे साडे तीन एकर कोरडवाहू शेती होती. या शेतीवर आपला उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, बुधवारी दि.14 मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या स्वत:च्या शेतातील झाडाला दोरी बांधुन गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई असा परिवार आहे. तरूण व होतकरू शेतकर्‍याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालु होती.