होमपेज › Marathwada ›  जिल्ह्यात होणार 166 कि.मी.चे रस्ते, 83 कोटींचा निधी 

 जिल्ह्यात होणार 166 कि.मी.चे रस्ते, 83 कोटींचा निधी 

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 19 2018 1:22AMहिंगोली : प्रतिनिधी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सन 2017-18 या वित्तीय वर्षात 166.46 कि.मी. अंतराच्या रस्त्याच्या कामाकरिता 83 कोटी 58 लाख रुपयांची मान्यता मिळाली असल्याची माहिती पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी, सेनगाव या तालुक्यांतील रस्त्याच्या कामाकरिता शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन 2017-18 या वित्तीय वर्षात रस्त्याच्या दर्जोन्‍नतीसाठी 83 कोटी 58 लाख रुपयांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून जिल्ह्यातील 166.46 कि.मी. अंतराचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत.

ज्यामध्ये कळमनुरी तालुक्यातील प्रजीमा-12 ते महालिंगी तांडा राष्ट्रीय महामार्ग 161 जटाळवाडी, मोरवड, खरवड, राष्ट्रीय महामार्ग 248 ते मकोडी, जामआंध, वडहिवरा, ग्रामा-44 ते कारेगाव, पार्डी, रामा-227 ते साखरा तांडा, सेनगाव तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग 227 हत्ता तांडा, इजिमा-22 लिंबाळा-आमदरी अशा अनेक रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. या रस्त्याच्या मंजुरीबाबत माहिती देताना पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह आमदार तानाजी मुटकुळे, माजी आ.गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, नगरसेवक गणेश बांगर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, कळमनुरीचे माजी आमदार गजानन घुगे यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यासाठी भरीव निधी खेचून आणला आहे.