Fri, Mar 22, 2019 02:09
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › राज्यात सत्ता आल्यास महाराष्ट्राची चार राज्ये करू’

राज्यात सत्ता आल्यास महाराष्ट्राची चार राज्ये करू’

Published On: Mar 01 2018 1:34AM | Last Updated: Feb 28 2018 11:54PMहिंगोली : प्रतिनिधी

छोटी राज्य झाल्यास राज्यांचा विकास होतो. तसेच कामे करण्यासाठी आर्थिक नियोजन सहज शक्य होते. त्यामुळे बहुजन समाज पार्टीची सत्ता आल्यास महाराष्ट्राची विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि महाराष्ट्र असे चार राज्य करण्यात येतील. असे आश्‍वासन बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी दिले. बहुजन समाज पक्षाच्या वतीने हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत आहेत. यावेळी प्रदेश प्रभारी प्रा. ना. तु. खंदारे, जिल्हाध्यक्ष के. जी. मस्के आदींची उपस्थिती होती. साखरे म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष केवळ भावनेचे राजकरण करीत आहेत. वेगळा विदर्भ करण्याचे भाजपचे आश्‍वासन केवळ धूळफेक आहे.

आता काँग्रेस पक्षसुद्धा वेगळा विदर्भ करण्याच्या नावाखाली सत्ता देण्याचे आवाहन करीत आहेत; परंतु आम्ही जेव्हा महाराष्ट्रात फिरतो त्यावेळी प्रत्येक विभागाचा असमतोल विकास झाल्याचे दिसून येते. याला कारण महाराष्ट्र राज्याचे व्यापक स्वरूप आणि कुचकामी राजकीय नेतृत्व हे आहे, परंतु बहुजन समाज पार्टी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तेत आल्यास आम्ही जन भावना समजून मराठी भाषिक लोकांचे विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि महाराष्ट्र असे चार राज्य केले जातील, असे त्यांनी घोषित केले.