Thu, Jun 20, 2019 21:46होमपेज › Marathwada › मान्सूनपूर्व पावसाने शेतकर्‍यांना दिलासा

मान्सूनपूर्व पावसाने शेतकर्‍यांना दिलासा

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 12:25AM बीड : प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात गुरुवारी विविध ठिकाणी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी किरकोळ पाऊस झाला तर काही तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने बंधारे हाऊसफु ल्ल झाली. महसूल विभागाने शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार गुरुवारी रात्री सरासरी 3.6 मि.मी. पाऊस झाला. दरम्यान, वादळी वार्‍यामुळे काही भागांतील घरावरील पत्रे उडून गेले होते.

बीड शहरात गुरुवारी दुपारी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. यानंतर रात्री उशीरा जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यामध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक सरासरी 15.3 मिमी पाऊस झाला. त्या खालोखाल पाटोदा तालुक्यात 5.8 मिमी, शिरूर तालुक्यात 5 मिमी, अंबाजोगाई तालुक्यात 6.4 मिमी, केज तालुक्यात 6 मिमी, धारूर तालुक्यात 1 मिमी तर गेवराई तालुक्यात 0.1 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. 

गुरूवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे पाटोदा व शिरूर तालुक्यातील काही भागात नुकसान झाले आहे. यामध्ये काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. याशिवाय पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका, चुंभळी, येवलवाडी, तांबाराजुरी, शिखरवाडी, कुटेवाडी या भागातील जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून जाण्यासह या भागात तसेच पैठण-पंढरपूर रोडलगत वीज मंडळाचे कामे सूर होती. त्यातील  विद्युत खांब या पावसाने खाली पडले नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला  आहे.

उकाड्यापासून दिलासा
जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या 105 टक्के पाऊस झाला होता. गतवर्षी मुबलक पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाई तेवढी जाणवली नाही, मात्र यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत असल्याने यापासून सुटका होण्यासाठी विशेषतः शहरी भागातील नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा शेतकर्‍यांना दिला.

पावसाचा महसूल मंडळनिहाय आढावा 
केज तालुक्यातील होळ महसूल मंडळात सर्वाधिक 42 मि.मी. पावसाची नोंद झाली. या खालोखाल आष्टी तालुक्यातील पिंपळा मंडळात 30 मि.मी., टाकळसिंग मंडळात 23 मि.मी., बर्दापूर मंडळात 18 मि.मी., दौलावडगाव मंडळात 16 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.