Tue, Apr 23, 2019 10:10होमपेज › Marathwada › जिल्ह्यात वादळी पाऊस

जिल्ह्यात वादळी पाऊस

Published On: May 28 2018 1:52AM | Last Updated: May 27 2018 10:55PMपरभणी : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील पूर्णा, गंगाखेड व परभणी तालुक्यात 26 मे रोजी रात्री झालेल्या विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात 6 शेळ्या दगावल्या असून एक बैल जखमी झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर विजेच्या खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

बंधारे तुडुंब

पूर्णा : तालुक्यातील आहेरवाडी येथील भीमराव परसराम खिल्‍लारे व नावकी येथील काशीनाथ राऊत या दोन शेतकर्‍यांच्या 6 शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून पांगरा ढोणे येथील रंगनाथ कुंडलिक ढोणे या शेतकर्‍याच्या बैलास टिनपत्रे लागल्याने तो जखमी झाला. तसेच पांगरा ढोणे गावाजवळील एका नदीचा बंधारा तसेच नवीन बंधाराही या पावसामुळे तुडुंब भरला. याबरोबरच सुरवाडी शिवार देगाव येथील रावसाहेब सुभाषराव इंगोले यांचे उभे केलेले शेड वार्‍यात उडाले.

झाडे कोसळली

पिंगळी : येथे वादळी वार्‍याच्या तडाख्याने अनेक घरावरील टिनपत्रे उडाल्यामुळे घरात पाणी शिरल्याने धान्य व इतर खाद्य वस्तूंचे नुकसान झाले. मंदिर परिसरातील 250 वषार्र्ंपूर्वीचे चिंचेचे व लिंबाचे झाड उन्मळले. रेल्वे स्टेशनमधीलही झाडे पडली. पिंगळी-ताडकळस रस्ता बंद झाला. तसेच घरात आईसोबत झोपलेल्या 8 वषार्र्ंच्या प्रतीक्षा गरुड व माना जाधवही जखमी झाली. तसेच त्रिंबक गरुड यांच्या व सुहास खाकरे यांच्या केळीचे झाडे पडल्याने नुकसान झाले.