Tue, Mar 19, 2019 12:23होमपेज › Marathwada › जिल्ह्यातील 7 लाख शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील 7 लाख शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बीड : शिरीष शिंदे 

शेतकर्‍यांनी लागवड केलेल्या कपाशीवर बोंड अळीने हल्ला केल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे कपाशीचे उत्पादन यंदा निघाले नाही. साधारणतः चार महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून बोंड अळीमुळे 3 लाख 77 हजार क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल शासनाला कळविले होते. बीड जिल्ह्यातील 6 लाख 92 हजार शेतकर्‍यांसाठी 256 कोटी 58 लाख रुपयांचे अनुदान मागणी केली आहे, मात्र अद्याप उत्पादकांची प्रतीक्षा कायम आहे. 

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते अखरे पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यातील अनेक शिवरात उभ्या असणार्‍या कपाशीवर बोंड अळीने हल्ला केला होता. बहरात आलेले कपाशीचे पीक वरून अगदी चांगले दिसत असले तरी बोंड अळीने आतून त्याला पोखरून काढले असल्याचे पहाणी दरम्यान आढळून आले होेते. बोंड अळीची बाधा होण्याची अनेक कारण सांगितली गेेेली, तसेच कॉटन कंपनी बियाणी निकृष्ट असल्याचा आरोपही मागच्या दोन महिन्यांपूर्वी राजकारण्यांसह शेतकर्‍यांनी केला होता. याप्रश्‍नी अधिक उद्रेक वाढेल म्हणून शासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसान प्रशासनाने बांधावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी करत आपला अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला. त्यानुसार बागायत व जिरायतीची वर्गवारी करून शासनाला बोंड अळीमुळे 3 लाख 77 हजार क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल कळविला होता. बीड जिल्ह्यातील 6 लाख 92 हजार शेतकर्‍यांसाठी 256 कोटी 58 लाख रुपयांचे अनुदान मागणी केलीही केली होती, मात्र अद्याप अनुदानावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.


  •