Fri, Nov 16, 2018 09:03होमपेज › Marathwada › ३ हजाराची लाच घेताना ग्रामसेविका जाळ्यात

३ हजाराची लाच घेताना ग्रामसेविका जाळ्यात

Published On: Jan 09 2018 5:27PM | Last Updated: Jan 09 2018 5:27PM

बुकमार्क करा
हिंगोली : प्रतिनिधी

बांधकाम कामगाराने काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी हिंगोली तालुक्यातील जांभरून तांडा येथील ग्रामसेविका दगुबाई आनंदराव खोंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील जांभरून तांडा येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेविका म्हणून दगुबाई खोंडे ह्या कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदार बांधकाम कामगारास काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी दि.८ जानेवारी रोजी चार हजाराची लाच मागितली होती. 

याबाबत संबंधित तक्रारदाराने रितसर हिंगोली येथील एसीबीच्या कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केली असता. यात तडजोडी अंती तीन हजार रूपयाची लाच स्विकारण्यास सहमती देण्यात आली. यावरून मंगळवारी दि.९ जानेवारी रोजी सकाळी ११.५० वाजण्याच्या दरम्यान हिंगोली शहरातील आनंद नगरात राहत्या घरी असलेल्या कार्यालयात ग्रामसेविका दगुबाई खोंडे यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले.

सदर कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक सुनिल जैतापुरकर, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, पो.नि जितेंद्र पाटील, पो.हे.कॉ शेख उमर, सुभाष आढाव, अभिमन्यु कांदे, पो.ना शेख जमिर, ओमप्रकाश पंडीतकर, विजयकुमार उपरे, संतोष दुमाने, महारूद्रा कबाडे, पो.शि प्रमोद थोरात, अविनाश किर्तनकार, चापोना आगलावे यांच्या पथकाने केली.