Fri, Jul 19, 2019 16:01होमपेज › Marathwada › हरभराप्रश्‍नी शेतकरी संतप्त

हरभराप्रश्‍नी शेतकरी संतप्त

Published On: Jun 01 2018 2:07AM | Last Updated: May 31 2018 11:08PMमाजलगाव : प्रतिनिधी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टिएमसी च्या आवारात मापावाचून पडलेल्या हरभरा धान्या मुळे शेतकरी संतप्त झाले असून, ते खरेदी केंद्रावर तळ ठोकून होते. या शेतकर्‍यांना सभापती अशोक डक, उपसभापती निळकंठ सोळंके हे खरेदीची मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून शुक्रवारी या प्रश्नावर बाजार समिती शेकडो शेतकर्‍यांसह रस्तारोको आंदोलन करणार आहे.

माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी केंद्रात 1 हजार 252 शेतकर्‍यांचा 18 हाजार 870 क्विंटल हरभर्‍याचे माप होण्याच्या आतच खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याने परेशान झालेला शेतकरी आपल्या मालाचे कसे होणार याच चिंतेत आसताना आज हजारो शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावर ठाण मांडून बसल्याने बाजार समितीचे सभापती अशोक डक उपसभापती निळकंठ भोसले, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी जयदत्त नरवडे यांनी या खरेदी केंद्रावर येऊन शेतकर्‍यांच्या भावना समजावून घेत ही खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाच्या विरोधात शेतकर्‍यांसह आम्ही स्वःतः रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितल्याने आज दि.1 जून रोजी राष्ट्रीय महामार्ग 222 वर रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलात हजारो शेतकरी उतरणार आहेत. खरेदी केलेल्या मालासाठी शासकीय गोडाऊन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

कृषीमंत्री पांडुरंग फुं डकर यांना श्रद्धांजली 

बाजार समितीच्या आवारात हरभरा उत्पादक शेतकरी आपल्या हरभरा खरेदी केंद्रावर आले असता, बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती निळंकठ भोसलेसह संचालक व शेतकर्‍यांनी कृषीमंत्री पांडुरंग फु ंडकर यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.