Tue, Mar 26, 2019 23:53होमपेज › Marathwada › शासकीय-अशासकीय समित्यांना स्थगिती 

शासकीय-अशासकीय समित्यांना स्थगिती 

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 12:21AMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हास्तरावरील शासकीय व अशासकीय समित्यांची निवड करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेतले नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 29 जानेवारी रोजी मुंबईत भेट घेतली. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या सर्व समित्यांना स्थगिती दिली. 

परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतेच जिल्ह्यातील शासकीय-अशासकीय समित्यांचे  गठन केले  होते. या समित्या गठीत करताना त्यांनी भारतीय जनता पार्टीतील कोणत्याही पदाधिकार्‍याला विश्वासात न घेता समित्यांवर केवळ शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांची वर्णी लावली, असा आरोप भरोसे यांनी केला आहे. या गठीत केलेल्या समितीत भाजपमधील एकाही कार्यकर्त्याची निवड केली गेली नाही. या संदर्भात परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेऊन या समित्यांविषयी सविस्तर माहिती दिली. या सर्व बाबींचा विचार करून पालकमंत्र्यांनी निवडलेल्या सर्व समित्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची माहिती  भरोसे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.