Sun, Jul 21, 2019 08:33होमपेज › Marathwada › आमचे नाते जनतेतेच्या वेदनांशी : पंकजा मुंडे

आमचे नाते जनतेतेच्या वेदनांशी : पंकजा मुंडे

Published On: Dec 12 2017 8:43PM | Last Updated: Dec 12 2017 8:43PM

बुकमार्क करा

परळी वैजनाथ : प्रतिनिधी 

वैद्यनाथ साखर कारखान्यातील कर्मचारी हे माझे कुटूंबिय आहेत. दुर्घटनेत काही जण मृत्यू पावले. त्यामुळे सुतकात असल्याने आपण सर्व कार्यक्रम रद्द केले परंतू राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या प्रमाणावर जयंतीदिनी दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना थांबवणे अशक्य आहेत. काही झाले तरी लोकांच्या वेदनांशी समरूप होणे हिच मुंडे साहेबांची शिकवण आहे. आमचे नाते हे  जनतेच्या वेदनांशी आहे आणि ते शेवटपर्यंत निभवू असे भावनिक मत नामदार पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथगडावर केले. 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी होणारे सर्व कार्यक्रम रद्द होऊनही लोकनेत्याच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच राज्याच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर गर्दी केली होती. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी  कुटूंबियांसह गडावर उपस्थित राहून सर्वांचे अभिवादन स्विकारले. प्रारंभी  वैद्यनाथ कारखान्यातील दुर्घटनेत मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

यावेळी प्रज्ञाताई मुंडे, खा. डॉ. प्रितम मुंडे, डॉ. अमित पालवे, अॅड. यशश्री मुंडे, राज्याचे पशूसंवधर्न व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे,  जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आमदार केशवराव आंधळे, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार केशवराव आंधळे, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राधाताई सानप, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदित्य सारडा, बंजारा नेते मांगीलाल चव्हाण, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, रामराव खेडकर, धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, विजय गोल्हार, संतोष हंगे, नगराध्यक्ष स्वरूपसिंह हजारी, सहाल चाऊस, अजित वरपे, विजयकुमार बंब, नरेंद्र कांकरिया, दिलीप खिस्ती आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्याच्या ग्रामविकास , महिला व बालकल्याण  मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आपल्या पित्याच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेत आठवणी जाग्या केल्या. आपल्या पित्याने पाहिलेले वंचित, उपेक्षित, सर्वसामान्य माणसाचे सुख व विकासात्मक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण कार्य करत आहोत. जीवनात मुंडे साहेबांचा वसा व वारसा चालवताना जनसेवा हे आपले मुख्य तत्व आहे. आमचे नाते जनतेच्या वेदनांशी असून अविरतपणे लोकांच्या पीडा दूर करण्यासाठी कटीबद्ध राहू. त्यामुळे न डगमगता आपण सदैव लोकांच्या कामात राहू असा खंबीर विश्वास ना. पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.