Sun, Jul 21, 2019 08:19होमपेज › Marathwada › पाटोद्याच्या गोल्डन बॉय राहुलचे  पंतप्रधानांकडून कौतुक!

पाटोद्याच्या गोल्डन बॉय राहुलचे  पंतप्रधानांकडून कौतुक!

Published On: May 01 2018 7:57PM | Last Updated: May 01 2018 7:57PM पाटोदा : प्रतिनिधी

पाटोद्याचा सुपुत्र गोल्डन बॉय राहुल आवारे याने आणि राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजते व सर्व राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू यांनी सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी सर्व विजेत्यांचे स्वागत केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मोदी यांनी  राहुलचे  अभिनंदन करताना त्याने घेतलेल्या कष्टाचे, मेहनतीचे कौतुक केले. राहुलच यश हे तरुणांना प्रेरणादायी आहे. मेहनत केली तर यश नक्की मिळते. राहुल ग्रामीण भागातून आला असला तरी त्याने मिळवलेले यश हे खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्‍हटले. मोदी यांनी राहुलला येत्या ऑलम्पिकमध्ये सुर्वण पदक मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय क्रिडामंत्री राजवर्धन राठोड आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.