Mon, Feb 18, 2019 20:13होमपेज › Marathwada › सोनवळा जळीत प्रकरणातील अल्पवयीन युवतीचा मृत्यू

सोनवळा जळीत प्रकरणातील अल्पवयीन युवतीचा मृत्यू

Published On: Jan 06 2018 10:34AM | Last Updated: Jan 06 2018 10:34AM

बुकमार्क करा
बीड : प्रतिनिधी

लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने त्याची आई आणि मामा-मामीच्या साह्याने प्रज्ञा ऊर्फे सोनाली सतिश मस्के (वय १७, रा. सोनवळा) या अल्पवयीन युवतीच्या घरात घुसून रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे घडली होती.

गंभीररित्या भाजलेल्या प्रज्ञावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, मागील दहा दिवसापासून प्रज्ञाची मृत्यृसोबत सुरु असलेली झुंज आज संपली.  रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास प्रज्ञाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.