Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Marathwada › गंगाखेडचा पूल किती  जणांचा बळी घेणार? 

गंगाखेडचा पूल किती  जणांचा बळी घेणार? 

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 04 2018 11:48PMपालम : मारोती नाईकवाडे

गंगाखेड शहरातील प्रमुख राज्य महामार्गावर रेल्वे विभागाकडून  मागील एक वर्षापासून पुलाचे काम  सुरू आहे. या कामामुळे  सदर मार्गावर   मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे.
 गंगाखेड तालुक्यातून नांदेडकडे जाणारे रुग्ण व पालमहून गंगाखेडकडे   जाणारे अनेक रुग्ण रखडलेल्या कामामुळे वाटेतच दगावल्याचे प्रकार घडले आहेत. हा पूल आणखी किती जणांचा बळी घेणार? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

दिवसेंदिवस होणारी  वाहतुकीची कोंडी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रमुख  महामार्गावरून जाणार्‍या वाहनासाठी अडथळा होऊ नये म्हणून रेल्वे गेटजवळ पुलाचे बांधकाम सुरू केले  आहे. हे काम मागील एक वर्षापासून चालू असल्यामुळे पुलाच्या या कामामुळे प्रमुख महामार्गावर जाणार्‍या वाहनचालकांना अनेक समस्याना सामोेरे जावे लागत आहे. या मार्गावरील जाणार्‍या रुग्णांना यांच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

शहराजवळ रेल्वे विभागाने वाहतुकीची होत असलेली कोंडी लक्षात घेता रेल्वे फाटकावर वाहनधारकांना जाण्यासाठी एका पुलाची उभारणी करण्याचा निर्णय मागील 3 वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. 
या पुलाचे काम एक वर्षांपासून सुरू असतानाही आजपर्यंत हा पूल अर्धवट अवस्थेत असल्याने या महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगांच रांगा पहायला मिळत आहेत. गंगाखेड तालुक्यातील गंभीर रुग्णांना उपचार करण्यासाठी गंगाखेडवरून नांदेडकडे उपचारासाठी नेले जातात. तर पालम येथून गंगाखेडकडे अनेक रूग्ण उपचारासाठी शासकीय व खाजगी वाहतुकीने उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी जातात.