Wed, Jul 24, 2019 13:00होमपेज › Marathwada › पाण्यासाठी आत्मदहनाचा इशारा

पाण्यासाठी आत्मदहनाचा इशारा

Published On: Mar 22 2018 1:42AM | Last Updated: Mar 22 2018 12:17AMकेज : प्रतिनिधी

केज तालुक्यातील विडा येथे सन 2008 मध्ये 1 कोटी 87 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती.  दहा वर्षांनंतरही या योजनेचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

सदरील पाणीपुरवठा समितीने सांगवी-सारणी धरणात विहीर खोदली असून पाइपलाइन केली आहे, मात्र खोदलेली विहीर अपूर्ण असून त्यावरून करण्यात आलेली पाइपलाइन सुद्धा ठिकठिकाणी फुटली आहे. या योजनेचे काम पूर्ण करून देण्याच्या मागणीसाठी आता विडा ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

इस्टीमेट प्रमाणे काम केले नसल्याने पाइपलाइन पूर्णता नादुरुस्त असून टाकीवर फिल्टर बसवलेले नाही, तसेच गावात करण्यात आलेली पाइपलाइन अर्धवट असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, मात्र सांगवी-सारणी धरणात मुबलक पाणीसाठा असताना जुनी निष्क्रिय पाणीपुरवठा समिती व सबंधित अधिकार्‍यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

स सदरील योजना पूर्ण करावी यासाठी आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवा अधिकारी यांना अनेकदा निवेदने दिले परंतु काहीही उपयोग झाला नाही. आता गावकरी शनिवार दि.24 रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर धैर्यशील देशमुख, सरपंच भैरवनाथ काळे, उपसरपंच बापूराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे, शिवाजी वाघमारे, सुहास पवार, पराक्रम घुटे, वसंत शिंदे, सुंदर देवगुडे, कल्याण घाडगे, अंकुश कलाणे, शुभम पटाईत यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

सुहास पवार, (ग्रामपंचायत सदस्य) : विडाग्रामीण पाणीपुरवठा आधिकार्‍यांना वेळोवेळी निवेदने दिले. रस्तारोको आंदोलन करण्यात आले मात्र अधिकार्‍यांनी कोणतीच कारवाई न केल्याने आम्ही आत्मदहन करणार आहोत.