Fri, Apr 26, 2019 19:49होमपेज › Marathwada › माहुरच्या वसतिगृहातील ३७ विद्यार्थ्यांना विषबाधा

माहुरच्या वसतिगृहातील ३७ विद्यार्थ्यांना विषबाधा

Published On: Jan 31 2018 8:35PM | Last Updated: Jan 31 2018 8:35PMनांदेड : प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालणार्‍या अनुसूचित जाती मुलींच्या निवासी शाळेमधील मुलींना दुपारचे जेवण केल्यानंतर विषबाधा झाली. ३३ मुलींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून सर्व मुलींची तब्यत धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भोजनासंबंधी निकृष्ठ पुरवठा करणार्‍या हिंदुजा कंपनीसोबत समाजकल्याण अधिकार्‍यांची मिलीभगत असल्याने निकृष्ठ भोजनातून विषबाधा होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

येथील निवासी शाळेत सहावी ते दहावीपर्यंतच्या १९० मुली  शिक्षण घेतात. दुपारचे जेवण घेतल्यानंतर मुलींना चक्कर येणे व उलटया व्हायला सुरुवात झाली. मुलींना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास ३३ मुलींना भरती करण्यात आले. या मुलींवर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. भोसले यांनी तपासणी करून उपचार केले.   

उपचारासाठी भरती करण्यात आलेल्या मुलींमध्ये समिक्षा पाझारे, खुषी बोरकर, श्‍वेता मेश्राम, तेजस्वनी खडसे, माधुरी  सावते, मयुरी गायकवाड, भारती रामटेके, सितरन  रुक्माने, आरती राऊत, दिव्या राऊत, सानिया खरतडे, तनुश्री लामकरे, पल्‍लवी हटकर, प्रेरणा वाघमारे, प्रांजली साळवे, प्रतिभा पाईकराव, ऐश्‍वर्या सावते, ज्योती वाढवे, अंजली पाटील, निकिता चव्हाण, करूणा भरणे, कल्यानी अढागळे, नेहा खंदारे, प्रतिभा देवताळे, रोशनी भवरे, प्रगती कंठेश्‍वर, स्वाती झगडे, वेदिका राऊत, रुतुजा हापसे, भाविका भगत, प्रज्ञा भवरे, पुजा पतंगे, सोनाली तोडसाम यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी वसतिगृहात जाऊन सर्व मुलींची तपासणी केली. अन्न नमूने घेऊन अन्न औषध प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले.