Thu, Feb 21, 2019 07:38होमपेज › Marathwada › लग्नात बिर्याणी खाल्याने तीनशे जणांना विषबाधा

लग्नात बिर्याणी खाल्याने तीनशे जणांना विषबाधा

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 30 2018 1:42AMनांदेड : प्रतिनिधी

मुदखेड येथील लग्न समारंभात बिर्याणी खाल्ल्याने जवळपास तीनशे जणांना विषबाधा झाली आहे. यामधील १६ जणांची प्रकृती खालावल्याने  नांदेड येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात हालविण्यात आले.

नईआबादी या  वसाहतीत एका विवाह सोहळा रविवारी दि. २९ रोजी झाला.  विवाहानंतर जेवणात  बिर्याणी खाल्ली. त्यानंतर  अनेकांना त्रास होऊ लागल्याने एकेक करून रूग्ण शासकीय रूग्णालयात दाखल होऊ लागले. सायंकाळपर्यंत ती संख्या तीनशेवर पोहोचली. त्यातील गंभीर १६ रूग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवीले.

दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने दाखल झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात पुरेसे डॉक्टर्स, परिचारिका व इतर स्टाफ उपलब्ध नसल्याने रूग्णांचे हाल झाले. त्यातच रूग्णालयाचे अधीक्षक संजय मनातकर हे वेळेत रूग्णालयात पोहोचले नव्हते. ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. शहरातील खासगी रूग्णालयाचे डॉक्टर  व लष्कराच्या सीआरपीएफ रूग्णालयातील  डॉक्टर सेवेसाठी उपस्थित आहेत.