Thu, Sep 20, 2018 13:06होमपेज › Marathwada › विवाहाच्या वाढदिवशी सिडकोत पत्नीचा खून 

विवाहाच्या वाढदिवशी सिडकोत पत्नीचा खून 

Published On: May 03 2018 8:21PM | Last Updated: May 03 2018 8:21PMसिडको : प्रतिनिधी 

विवाहाच्या पहिल्याच वाढदिवशी घरगुती  वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून खून केल्याची घटना सिडकोतील पंडितनगर येथेे घडली. घटनेनंतर संशयित सारिपुत्र पुंजाराम शिंदे फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सिडकोतील पंडितनगर येथेे सारिपुत्र पुंजाराम शिंदे (25) हे पत्नी रमा सारिपुत्र शिंदे (21) व आई-वडील, भाऊ यांच्यासमवेत राहत होते. मूळचे परभणीतील निखाडे या गावचे रहिवासी असलेले शिंदे कुटुंबीय नाशिकमध्ये दोन महिन्यांपूर्वीच राहायला आले होते. सारिपुत्र हा बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता. वर्षभरापूर्वीच त्याचा विवाह झालेला होता.

बुधवारी दुपार सायं. चारच्या दरम्यान दोघांमध्ये भांडण झाले व त्यात रागाच्या भरात सारिपुत्र याने घरातील भाजी कापण्याच्या सुरीने रमा हिच्या गळ्यावर व पोटावर वार करून गंभीर जखमी केले. या घटनेत रमा हिचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर संशयित सारिपुत्र शिंदे हा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये सारिपुत्र शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Tags : first marriage anniversary, wife, murder, in sidako, nashik,