Sun, May 26, 2019 18:42होमपेज › Marathwada › परळीत अग्नितांडव; चार दुकाने जळून खाक

परळीत अग्नितांडव; चार दुकाने जळून खाक

Published On: Aug 20 2018 12:55PM | Last Updated: Aug 20 2018 12:54PMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी

सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास शहरातील मोंढा परिसरात असलेल्या दुकानांना आग लागल्याने चार दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये ३५ ते ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्टेशन रोडवरील सरदारजी सायकल मार्टच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिकच्या दुकानात सकाळी ही आग लागली. बघता बघता आग बाजूच्या दुकानात आग पसरली. आग लागल्याचे समजताच नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्‍थळी दाखल झाली. आगीचे लोळ जास्त असल्याने नगरपालिकेसह इतर अनेक अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझविण्यात आली. 

आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. काही अनर्थ होऊ नये यासाठी परिसरातील संपूर्ण वीज बंद करण्यात आली होती. यासाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी सकाळी साडेपाच पासून घटनास्थळी ठाण मांडून होते. आगीचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच घटनास्थळी मोठा जनसमुदाय जमा झाला होता.