Wed, Apr 24, 2019 21:33होमपेज › Marathwada › बीड : शासकीय गोदामाला आग; कोट्यवधींचे नुकसान

बीड : शासकीय गोदामाला आग; कोट्यवधींचे नुकसान

Published On: Jul 22 2018 12:51PM | Last Updated: Jul 22 2018 12:51PMबीड : प्रतिनिधी

शहरानजीक कुर्ला रोडवर असलेल्या बाजार समितीच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत कोट्यवधी रुपयांच्या कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या २० गाड्या आग विझवण्याचे काम करत असून आठ तासानंतही आग विझवण्यात पूर्णपणे यश आलेले नाही.

बीड येथील कापसाचे व्यापारी तथा जिनिंगचे मालक राजू संचेती यांनी सदरील शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी ठेवल्या होत्या. त्या गोदामाला सोमवारी पहाटे अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. गोदामात कोट्यवधींच्या कापसाच्या गाठी ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

बीड व शहर व जिल्ह्यातील अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत पण दुपारी 12 वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. कोट्यवधी रुपयांच्या कापूस गाठी आगीत जळून राख झाल्या आहेत. आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. आगीचे कारण गुलदस्त्यात असल्याने उलट सुलट चर्चा होत आहे.