Wed, Feb 20, 2019 09:08होमपेज › Marathwada › पाळोदीत कडब्याच्या गंजीला भीषण आग

पाळोदीत कडब्याच्या गंजीला भीषण आग

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 29 2018 11:57PMमानवत : प्रतिनिधी

तालुक्यातील पाळोदी येथे 4 शेतकर्‍यांच्या कडब्याच्या गंजीला रविवारी (दि.29)  सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत कडब्याच्या 10 हजार पेंड्या भस्मसात होऊन सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.  

पाळोदी येथे साठवून ठेवलेल्या कडब्याच्या गंजीस अचानक आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने बघता बघता रौद्र रूप घेतले. गावातील सर्व ग्रामस्थ आपापल्या घरातील साठवलेले पाणी घेऊन घटनास्थळी धावले, परंतु आग आटोक्यात आली नाही. 

गावातील नागरिक मतीन खान यांनी आ.बाबाजानी दुर्रानी यांना फोन केल्यानंतर मानवत व पाथरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या पाठविण्यात आल्या. त्यानंतर तब्बल 2 तासाने आग नियंत्रणात आली. या आगीत मियाखान व हबीबखान यांच्या प्रत्येकी अडीच हजार, शादेक खान यांच्या 3 हजार तर शेख लुकमान यांच्या 2 हजार पेंड्या आगीत जळून खाक झाल्या. यामध्ये तब्बल दीड ते 2 लाखांचे नुकसान झाले आहे.