होमपेज › Marathwada › दोन गटांत हाणामारी, महिलेचा कान तुटला

दोन गटांत हाणामारी, महिलेचा कान तुटला

Published On: Dec 20 2017 9:56AM | Last Updated: Dec 20 2017 9:56AM

बुकमार्क करा

वैजापूर : प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील डवाळा शिवारात घडली. यात एका महिलेचा कान तुटला असून तिचे 4 हजार रुपयांचे सोनेही पळविले आहे. परस्परविरोधी फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात सहा जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील डवाळा येथील ज्योती दिवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ऋषिकेश बहिरट, मिथून बहिरट, राकेश बहिरट, बाबासाहेब बहिरट व अन्य दोन अनोळखी इसमांनी सोमवारी रात्र 8 वाजेला शेतवस्तीवर येऊन जातीवाचक शिवीगाळ करून लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. यात ज्योती यांच्यासह एकजण जखमी झाला आहे. मारहाण करताना जिवे मारण्याची धमकीही त्यांना दिली. त्यांच्या तक्रारीवरून या सहा जणांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर गंगुबाई बहिरट यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गावातीलच लखन दिवे, भारत दिवे, ज्योती दिवे, शीला दिवे, कोमल दिवे व अमोल नवगिरे हे सर्वजण सोमवारी रात्री 8 वाजेला त्यांच्या शेत गट क्र.124 मध्ये आले. त्यांनी हातातील लाठ्याकाठ्यांनी बहिरटकुटुंबीयांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी झालेल्या झटापटीत गंगुबाई यांच्या कानाचा लचका तोडला तसेच डाव्या कानातील दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तोडून पसार झाले. याप्रकरणी गंगुबाई बहिरट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.