Thu, Jun 20, 2019 14:43होमपेज › Marathwada › वडीलांना जाळणार्‍या मुलाच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना

वडीलांना जाळणार्‍या मुलाच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना

Published On: Dec 18 2017 6:18PM | Last Updated: Dec 18 2017 6:18PM

बुकमार्क करा

लातूर : प्रतिनिधी 

जेवत असलेल्या पित्यावर कुर्‍हाडीचे घाव घालून त्यांना जाळणाऱ्या मुलाच्या शोधासाठी दोन पोलिस पथके रवाना झाली आहेत. शेतीच्या वाटणीवरुन उदगीर तालुक्यातील चांदेगाव शिवारात रविवारी दुपारी हा प्रकार घडला होता. या खून प्रकरणातील आरोपी लवकरच जेरबंद  होईल अशी माहिती पोलिसांनी दिली. 

या प्रकरणात केरबा गणपती वंगवाड (वय ६०) असे मृत वडीलांचे नाव आहे. रविवारी केरबा आपल्या परिवारासह वेळअमावस्या साजरी करण्यासाठी शेतावर गेले होते. यावेळी ते जेवण करीत असताना त्यांचा थोरला मुलगा गोविंदने वडीलांवर कुर्‍हाडीने घाव घातले. 

यावेळी त्‍यांच्या आईने त्‍याला अडविण्याचा प्रयत्‍न केला, मात्र यावेळी त्यांच्यावरही वार करण्यात आले. यामध्ये त्याही जखमी झाल्या होत्या. यावेळी गोविंदने मृत वडीलांचा मृतदेह झोपडीत घेऊन जाऊन ती झोपडीच पेटवून देण्यात आली. यानंतर गोविंद फरार झाला होता. सोमवारी पोलिसांनी सालगड्याचा जबाब नोंदवल्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी सांगितले. 

या प्रकारामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. गोविंद आपल्या वडीलांकडे जमिनीची वाटणी मागत होता. ती वाटणी देत नसल्याने त्‍यांनी वडीलांचा खून केला असल्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी सांगितले.