Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › रेल्वेसमोर उडी घेवून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

रेल्वेसमोर उडी घेवून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Jun 21 2018 5:38PM | Last Updated: Jun 21 2018 5:38PMवसमत : प्रतिनिधी

वसमत तालुक्यातील बाभुळगाव शिवारात  तरुण शेतकर्‍याने दुबार पेरणीचे संकट व बँकाचे कर्ज परतफेड होत नसल्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (दि.21) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लोण बुद्रुक येथील शेतकरी मारोती विठ्ठल मुळे (वय 35) यांच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी पैसै खर्च झाले होते. त्यातच पाऊस वेळेवर न झाल्यामुळे दुबार पेरणी करण्यासाठी रक्कम नव्हती. तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बाभुळगाव शिवारातील रेल्वे पटरीवर वसमत-पुर्णा जाणार्‍या रेल्वे समोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मयत शेतकर्‍यावर बँकांचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. 

तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी कामाजी मुळे यांनी दिलेल्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करित आहेत.