Mon, Apr 22, 2019 11:40होमपेज › Marathwada › बीड : वडवणीत  कर्जबाजारीमुळे युवा शेतकर्‍याची आत्‍महत्या

बीड : वडवणीत  कर्जबाजारीमुळे युवा शेतकर्‍याची आत्‍महत्या

Published On: Feb 13 2018 10:58AM | Last Updated: Feb 13 2018 11:16AMवडवणी: प्रतिनिधी

वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील भागवत लक्ष्मण फरताडे (वय ३४) या तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

भागवत फरताडे यांना एक दीड एकर शेती आहे. आर्थिक परिस्थिती बिघडल्याने ते ऊसतोडणीलाही जात होते. तरीही आर्थिक टंचाई भासत असल्याने व बँक कर्ज वाढल्याने त्यांनी खळवट लिमगाव शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती वडवणी पोलिसांना देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.