होमपेज › Marathwada › परभणीत शेतकरी आत्‍महत्येचे सत्र सुरूच

परभणीत शेतकरी आत्‍महत्येचे सत्र सुरूच

Published On: Feb 24 2018 6:00PM | Last Updated: Feb 24 2018 6:00PMपरभणी : पुढारी ऑनलाईन

परभणी जिल्‍ह्यात शेतकरी आत्‍महत्येचे सत्र आज तिसर्‍या दिवशीही कायम आहे. मानवत तालुक्यातील ईरदळ येथील ५५ वर्षीय शेतकर्‍याने कर्जबाजारीपणास कंटाळून आत्‍महत्या केली. बबन मुळे असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. 

बबन यांच्याकडे एका बँकेचे कर्ज होते. या कर्जबाजारी अवस्‍थेस कंटाळून त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्या केली. दरम्यान, गुरुवार आणि शुक्रवारीही जिल्‍ह्यात शेतकर्‍यांनी आत्‍महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या आत्‍महत्येच्या सत्रामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विचार करण्याची गरज असल्याच्या भावना संतप्‍त शेतकर्‍यांतून उमटत आहेत.