होमपेज › Marathwada › पीककर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या  

पीककर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या  

Published On: Jul 30 2018 8:32PM | Last Updated: Jul 30 2018 8:32PMमाहूर (जि. नांदेड): प्रतिनिधी

माहूर तालुक्यातील मौजे मालवडा येथील  शेतकऱ्याने सततची नपिकी, राष्ट्रीय बँकेचे थकीत कर्ज  व बँकेत चकरा मारूनही पीक कर्ज मिळत नसल्याने सोमवारी सायंकाळी ४ वाजता  आत्महत्या केली. सुभाष भोपा जाधव असे आत्‍महत्‍या केलेल्‍या शेतकऱ्याचे नाव आहे. 

माहूर तालुक्यातील एस.बी. आय.बँकेकडे मागील दोन महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांचे पीक कर्ज प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित मिळावे म्हणून खा. राजीव सातव, आमदार प्रदीप नाईक, यांनी बँके समोर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनही केले होते. तरीही शेतकऱ्यांची पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. याच प्रलंबित बँक कर्ज प्रकरणामुळे सुभाष जाधव यांनी आत्‍महत्‍या केली.