Wed, Mar 20, 2019 22:56होमपेज › Marathwada › लातूर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

लातूर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: Jun 27 2018 10:53PM | Last Updated: Jun 27 2018 10:53PMलातूर : प्रतिनिधी

कर्जाला कंटाळून निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. येथील एका अल्प भुधारक शेतकार्‍याने गळफास घेऊन बुधवारी सकाळी आत्महत्या केली. तानाजी संभाजी शिंदे (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. 

तानाजी हे अल्प भूधारक शेतकरी होते. शेतीतील उत्पन्नातून रोजचा खर्च भागात नव्‍हता. त्यामुळे ते मजुरीही करीत. आईचे आजारपण व मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेकांकडून उसनवारी केली होती. दोन एकर शेतीतून देणे कसे देणार या चिंतेत ते होते. कर्जाचा ताण असल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.