Thu, Jun 27, 2019 13:40होमपेज › Marathwada › शेतकरी संपाचा शिरूरच्या आठवडी बाजारावर परिणाम

शेतकरी संपाचा शिरूरच्या आठवडी बाजारावर परिणाम

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:33PMशिरूर ः जालिंदर नन्नवरे 

शेतकरी संप सुरू होऊन चार दिवसांचा कालावधी लोटला आहे. या शेतकरी संपाची झळ हळुहळु नागरिकांना बसू लागली आहे. संपाच्या चौथ्या दिवशी शिरूरच्या आठवडी त्याचा फटका पाहण्यासाठी मिळाला. मागिल आठवडी बाजाराच्या तुलनेत सोमवारी (दि. 4) केवळ 25 टक्केच भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आला. भाजीपाल्याची आवक घसरल्याने सोमवारच्या बाजारात (दि. 28) तुलनेत दरात दुप्पटीने वाढ झाली. ग्रामीण भागातून दुधाचा पुरवठा बंद असल्यामुळे शहरांमध्ये दुधाची टंचाई होती, तसेच भाजीपाल्याचीही आवक कमी होती.

देश भरातील शेतकरी विविध मागण्यासाठी 1 जून पासून संपावर गेला आहे. या देशव्यापी संपामुळे शेतकरी रस्त्यावर उतरत आहे. यामुळे संपाचे रूप उग्र होत आहे. याचा फटका शहरी भागाला बसायला सुरुवात झाली आहे. शेतमालाच्या पडलेल्या भावामुळे शेतकरी आर्थिक खाईच्या संकटात ढकलला जात असताना शेतकरी मोठ्या प्रमाणात संपात सहभागी होत आहे. तालुकाभरात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या शिरूरच्या आठवडी बाजारात या संपाचा परिणाम दिसून आला. मागील आठवडी बाजाराच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक थंडावली होती यामुळे भाजीपाल्याच्या दरवाढीचा फाटका बाजारातील ग्राहकांना सहन करावा लागला आहे. यासह शिरूर शहरात आसपासच्या खेड्यातून येणारे दुधही कमी प्रमाणात येऊ लागले आहे यामुळे मागील दोन दिवसांपासून दुधाचा तुटवडा देखील शहर वासियांना भासू लागला आहे.

देशव्यापी शेतकरी संप 1 जून पासून 10 जूनपर्यंत चालणार असल्याने शिरूरकरांना याचा आणखी फटका बसणार असाल्याची खंत शहरवासीय सध्या  करीत आहेत. खरीप हंगाम अवघ्या काही काळावर येऊन ठेपला असताना गर्दिने फुलणार्‍या बाजारपेठात देखील  शुकशुकाट आठवडी बाजाराच्या निमित्ताने पाहण्यासाठी मिळाला.