Fri, Jul 19, 2019 07:06होमपेज › Marathwada › मावेजासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन   

मावेजासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन   

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 12:31AMपरभणी : प्रतिनिधी

निम्न दुधना प्रकल्पाच्या कामासाठी शासनाने जमिनी संपादित केल्या. शासन निर्णयास बगल देत भूसंपादन कार्यालयाने संबंधित विभागासमवेत जमिनीची रजिस्ट्री  ही मागील निर्णय समोर ठेवून चुकीच्या पध्दतीने केल्याचे उघड झाले. संपादित जमिनीचा मोबदल्यासाठी टाळाटाळ होत असल्याने संबर व पिंपळगाव टोंग येथील 76 शेतकर्‍यांनी 1 जून रोजी माजलगाव कालवा विभाग कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास शेतकरी जायकवाडी परिसरात येताच त्यांंना पोलिसांनी ताब्यात घेत नंतर सुटका केली. 
महाराष्ट्र दिनीही इशारा दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी 5 एप्रिल रोजी नियमाप्रमाणे संपादित जमिनीचा मावेजा देण्याचे आदेशीत केले होते. शासनाने मावेजा देण्यात येईल असे आश्‍वास दिल्यानंतरही कारवाई झाली नसल्याने आत्मदहनाचा मार्ग अवलंबिला होता. 1 जून रोजी दुपारी 12 च्या सुमारास शेतकरी आत्मदहन करण्यासाठी जायकवाडी परिसरात येताच जायकवाडीच्या प्रवेशद्वार क्र.दोनवर या सर्व शेतकर्‍यांना रोखून पोलिसांनी ताब्यात घेतले. आत्मदहनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिस अधीक्षक दिलीप झळके यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवाला होता. पोलिस उपविभागीय अधिकारी संजय परदेसी, नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरसिंग ठाकूर, वाहतूक शाखेचे सहायक पो.नि. एस.एस.खान  यांनी जायकवाडी परिसरात हजर राहून आंदोलनकर्ते जायकवाडी परिसरात येणार नाही याची सतर्कता बाळगली होती. हातात रॉकेलच्या बॉटल व विषाच्या बॉटल घेऊन शेतकर्‍यांनी समाजकल्याण कार्यालयाकडे जाणार्‍या गेटमधून जायकवाडीत घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले. 

पोलिस उपविभागीय अधिकारी संजय परदेशी यांनी त्वरित पोलिस व्हॅन बोलावून सहभागी 73 पैकी 41 शेतकर्‍यांना ताब्यात घेतले. यावेळी आत्मदहनासाठी आणलेल्या विषाच्या बॉटल व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत. यानंतर पोलिसांनी सर्वांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले अशी माहिती नवा मोंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरसिंग ठाकूर यांनी दिली. 

या शेतकर्‍यांचा होता समावेश
गंगाधर चव्हाण, सुहास पवार, सुनील पवार, कैलास चव्हाण, रमेश चव्हाण, श्रीधर चव्हाण, रंगनाथ काळे, छबाबाई चव्हाण, ज्ञानोबा चव्हाण,गंगासागर चव्हाण, पुंडलिक चव्हाण, किशन कंठाळे, ज्ञानोबा चव्हाण, बाजीराव चव्हाण, शशिकला चव्हाण, कल्याण चव्हाण, दादाराव पवार, शिवाजी बोबडे, कालिंदाबाई चव्हाण, भास्कर चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, रंगनाथ चव्हाण, वेणुबाई चव्हाण, इंद्रजित बोबडे, सदाशिव चव्हाण, दामोदर चव्हाण, रामराव काळे, बालाजी पवार यांचा आंदोलनात समावेश होता.