Sat, Nov 17, 2018 09:59होमपेज › Marathwada › कर्जप्रकरण मंजुरीसाठी धरणे

कर्जप्रकरण मंजुरीसाठी धरणे

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:40AMमाजलगाव : प्रतिनिधी 

स्टेट बँके ऑफ इंडिया माजलगाव शाखेचे मॅनेजर यांनी केंद्रीय अर्थसाहाय्य योजना व बीज भांडवल योजने अंतर्गत जिल्हा अग्रणी बँक अधिकारी बीड यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे मातंग समाजातील युवकांचे कर्ज प्रकरण मंजूर झाले नाही. त्यामुळे मातंग समाजातील तरुणांची कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, यासाठी गुरुवारी माजलगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर मातंग समाज संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र मातंग समाज संघटनेचे जी. के. मिसाळ, सचिव बी. एस. नाडे, लक्ष्मीबाई शिंदे, रामकिसन शिंदे, भगवान खंडागळे, मधुकर घनघाव, राजेश आवाड, लक्ष्मण वाघमारे, भीमराव आलाट, राजाभाऊ सोनकांबळे, राजाभाऊ आलाट, सिंद्राम सोनवने यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी बसपाचे विधानसभा अध्यक्ष अमोल डोंगरे यांनी पाठिंबा दिला.