Mon, Mar 25, 2019 04:58
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › लातूरमधील शेतकऱ्यांना २०५ कोटी ७० लाखांची कर्जमाफी

लातूरमधील शेतकऱ्यांना २०५ कोटी ७० लाखांची कर्जमाफी

Published On: Dec 12 2017 8:30PM | Last Updated: Dec 12 2017 8:30PM

बुकमार्क करा

लातूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने घोषीत केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ६९६ पात्र   शेतकऱ्यांना २०५ कोटी ७० लाख रुपयांची  कर्जमाफी मंजूर  झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक बी. एल. वांगे यांनी दिली.

८ हजार ६५४  शेतकऱ्यांना वनटाइम सेटलमेट यंत्रणामार्फत अनुदान वितरण करण्यात आले असून ८९ हजार ८५७ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकाच्या लातूर जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलन १ ते ६६ नमुन्याप्रमाणे ऑनलाईन माहिती भरुन दिली होती. त्यानुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लातूर जिल्ह्यातील ५८६६९ शेतकऱ्यांना ९२ कोटी ३४ लक्ष ७९ हजार ९०८ रुपयाचे कर्जमाफी आतापर्यंत मिळाली आहे.

याबाबत आतापर्यत सुमारे ४२७८९शेतकऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून कळविण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीयकृत बॅकांच्या खातेदार १६ हजार १९६ शेतकऱ्यांच्या खाती ११३ कोटी ३६ लक्ष रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आल्याचे वांगे म्हणाले. जे शेतकरी कर्जमुक्त झालेले आहेत ते पुढील वर्षी कर्ज घेण्यासाठी पात्र होणार आहेत. या योजनेच्या अमंलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, लातूर व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. जे. जाधव, 
विविध कार्यकारी सेवा संस्थाचे गटसचिव, बँकेचे तपासणीस, विशेष वसुली अधिकारी, विभागीय अधिकारी, बँकांचा माहिती व तंत्रज्ञान विभाग, जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक, अग्रणी बँकांचे व्यवस्थापक आदींचे सहकार्य लाभले असेही वांगे यांनी सांगितले.