Fri, Apr 26, 2019 18:14होमपेज › Marathwada › सकाळपासून तूर विकण्यासाठी उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू 

सकाळपासून तूर विकण्यासाठी उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू 

Published On: Mar 22 2018 11:25PM | Last Updated: Mar 22 2018 11:35PMलोहारा: प्रतिनिधी

आपल्या शेतात पिकवलेली तूर घेवून हमीभाव केंद्रावर सकाळपासून तिष्ठत उभेरेल्या शेतकऱ्याचा अचानक चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना लोहारा (जि. उस्मानाबाद) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुकानाजवळ रात्री 7:30 वाजता घडली आहे. 

लोहारा तालुक्यातील करवंजी येथील शेतकरी रावसाहेब शिवराम हाके( वय 65 वर्षे) यांना करवंजी शिवारात तीन एकर शेती आहे. या शेतात पिकवलेली तुरी लोहारा येथील हमी भाव केंद्रावर आज ( गुरूवारी) सकाळी 8:00 वाजता विक्रीसाठी आले होते. तुरी विक्रीसाठी वेळ लागल्याने प्रतिक्षा करीत ते दिवसभर लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत दुकान आवारातच होते. रात्री 7:30 वाजता अचानक चक्कर येवून खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी लोहारा ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषीत केले.

मृत्यु उष्मघाताने की, इतर कारण

शेतकरी रावसाहेब शिवराम हाके यांची मृत्यु उष्म घाताने झाला की इतर कारण याविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत. परंतु याचे कारण वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
 

 

 Tags : osmanabad, osmanabad news,lohra, farmer died in queue, government  minimum support price station,  toor crop