Fri, Nov 24, 2017 20:19होमपेज › Marathwada › ‘१५ लाख द्या निवडणूक जिंकून देतो,’ तरुण ताब्यात

‘१५ लाख द्या निवडणूक जिंकून देतो,’ तरुण ताब्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नांदेड : प्रतिनिधी

महाराष्ट्र व हिमाचल प्रदेशमधील निवडणूक जिंकून देतो, असा दावा करणार्‍या एका युवकास पोलिसांनी अटक केली आहे. सचिन दत्ता राठोड असे अटक केलेल्‍या युवकाचे नाव आहे. नुकत्‍याच झालेल्‍या हिमाचल प्रदशेच्या निवडणुकी आणि नांदेड महापालिका निवडणुकीच्या दरम्यान या युवकाने काही उमेदवारांना संदेश पाठविले होते. मात्र, उमेदवारांनी या संदेशाकडे दुर्लक्ष केले होते.

यासंबंधी पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी माहिती दिली. या वेळी मीना म्हणाले, ‘‘पंधरा लाख रुपयांमध्ये निवडणूक मतदान यंत्रात फेरफार करून देतो. अशा आशयाचे संदेश आरोपी सचिन राठोड याने नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी ४३ उमेदवारांना पाठविले होते. नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्य वेळी सुद्धा ३७ उमेदवारांना त्‍याने संदेश पाठविले होते.  मात्र, नांदेडमध्ये आरोपीच्या या अमिषाला कुणीही बळी पडले नाही.’’     

त्यानंतर आरोपीने हिमाचल प्रदेश निवडणुकीत उभा राहिलेल्या उमेदवारांना असेच मेसेज तेथील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावाने पाठवले होते. या प्रकरणी शिमला येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे होता. या तक्रारी नंतर हा मेसेज पाठवणारा मोबाईल नंबर महाराष्ट्र-तेलंगना सिमेवरचा असल्याचे उघड़ झाले. त्यामुळे त्‍याचा तपास नांदेड पोलिसांकडे आला होता. 

पोलिसांनी आठ दिवस तपास करत सचिन राठोडला अटक केली. सचिन हा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचा पदवीधर आहे. सध्या नांदेड शहरातील सुंदर नगर येथे राहत असून, तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. चोरीच्या सिमकार्डचा वापर करून त्याने दोन्ही ठिकाणी हे मेसेज पाठवले होते. पैसे कमाविण्याचा शॉर्टकट म्हणून असे एसएमएस पाठविल्याचे सचिनने कबूल केले आहे.