Wed, Apr 24, 2019 08:17होमपेज › Marathwada › मजुरांचा तहसीलवर मूकमोर्चा

मजुरांचा तहसीलवर मूकमोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

माजलगाव : प्रतिनिधी

महसूल विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे यावर्षी वाळू ठेक्याचे लिलाव झाले नाहीत, केवळ हिवरा भादली या ठिकाणच्या एकच लिलाव झाला पण तो ही काही दिवसांतच बंद झाला. त्यामुळे वाळू वर आधारित असलेल्या पाच हजारांवर व्यावसायिकांनी, मजुरांनी  मंगळवारी तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढला.

 दरवर्षी महसूल विभागाच्या वतीने तालुक्यात अनेक गोदापात्रातील वाळू ठेक्याचा लिलाव करण्यात येत असतात. यंदा हिवरा भादली याठिकाणचा एकमेव वाळू ठेक्याचा लिलाव झाला. एकच वाळू ठेक्याचा लिलाव झाल्याने वाळूचा भाव सोन्या सारखा उसळी घेऊन 3 ब्रास ला 12 ते 15 हजार इतका जाऊन ठेपला. त्यात नियमबाह्य पद्धतीने उपसा सुरू असल्याच्या ठपका या वाळू ठेक्यावर ठेवल्याने तोही पूर्णतः बंद झाला. त्यामुळे काम बंद पडले. त्यावर आधारित असलेले व्यावसायिक, गवंडी, कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली. इलेट्रिशियन, नळजोडणीदार, फारशी व्यावसायिक, वीट उद्दोग हे ही उद्योग पुरते कोलमडले. त्यामुळे मजुरांच्या हातास कामही  शिल्लक राहिले नाही. वाळूचा तुटवडा आणि अवाच्या सव्वा झालेला भाव यातून बांधकाम करणार्‍यांनी काम थांबवल्याने मोठा प्रश्‍न उपस्थित झाला. त्यामुळे पोटासाठी कोणी ही दखल घेत नसल्याने हतबल झालेले मजूर, गवंडी, कामगार, व्यापारी यांनी शहरातील नवा मोंढा परिसरात एकत्र येत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकर्‍यांनी आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार एम. पी. झम्पलवाड यांना दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्याकडे मोर्चेकर्‍यांचे शिष्टमंडळ जाऊन वाळू चालू करून आमच्या पोटाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे मागणी केली.


  •