Fri, Jan 18, 2019 05:50होमपेज › Marathwada › पोलिस ठाणे, तहसील महावितरणचे देणीदार

पोलिस ठाणे, तहसील महावितरणचे देणीदार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बीड : दिनेश गुळवे

कोट्यवधी रुपयांच्या विद्युत थकबाकीने महावितरणचा जीव गुदमरला असताना इतर शासकीय कार्यालयांनाही याचे सोयरसुतक असल्याचे दिसून येत नाही. महावितरणकडून सध्या वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू असली तरी शासकीय कार्यालयांकडून थकबाकी कशी वसूल करावी, असा प्रश्‍न महावितरणसमोर आहे. जिल्ह्यातील तीन हजार शासकीय कार्यालये, इमारती, रहिवासी क्वॉटर यासह पोलिस अधीक्षक, तहसील, कृषी, रुग्णालय असे विविध शासकीय कार्यालये महावितरणचे थकबाकीदार आहेत. 
जिल्ह्यात महावितरणची कोट्यवधी रुपये विद्युत थकबाकी आहे. शेतकरी, व्यापारी, सामान्य ग्राहक, उद्योजक आदींकडे ही बाकी थकली आहे. या ग्राहकांवर वीज बिल भरावे यासाठी महावितरणकडून कारवाई करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शासकीय कार्यालयाकडेही महावितरणचे सहा कोटी 97 लाख रुपये थकले आहेत. यासाठी काही कार्यालयांचा विद्युत पुरवठा महावितरणने बंद केला आहे. 

बीड जिल्ह्यातील काही पोलिस ठाणे, पोलिस क्वॉर्टर यांचे विद्युत कनेक्शन पोलिस अधीक्षक यांच्या नावाने आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे दिसून येत आहे. बीड, अंबाजोगाई, गेवराई, परळी, माजलगाव आदी पोलिस ठाण्याकडे महावितरणचे लाखो रुपये थकले आहेत. यासह अंबाजोगाई, बीड, धारूर, गेवराई, केज आदी ठिकाणच्या रुग्णालयचेही विद्युत बिल थकले आहे. या कार्यालयांसह विविध ठिकाणचे शासकीय व शासकीय अनुदानित रुग्णालये, कृषी, वनखात्यांचे कार्यालय, शाळा, आयटीआय, विविध महाविद्यालय, ट्रेझरी कार्यालय, शासकीय विश्रामगृह, पाटबंधारे खात्याचे कार्यालय, क्वॉर्टर, पंचायत समिती कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, जिल्हा रुग्णालय, वसतिगृह, विक्री कर कार्यालय, मलेरिया कार्यालय आदी दोन हजार 757 कार्यालयाकडे महावितरणचे विद्युत बील थकले आहे. ही थकबाकी कशी वसुल करावी, असा प्रश्‍नही महावितरणला पडला आहे. सामान्य ग्राहक, शेतकरी यांना थकबाकीसाठी वेठीस धरणार्‍या महावितरणने या कार्यालयाकडूनही थकबाकी वसूल करावी, अशी मागणी होत आहे. 


  •