Tue, Jul 23, 2019 01:58होमपेज › Marathwada › लातूर : तेरणाच्या कालव्यात आढळले दोन महिलांचे मृतदेह

लातूर : तेरणाच्या कालव्यात आढळले दोन महिलांचे मृतदेह

Published On: May 15 2018 1:39PM | Last Updated: May 15 2018 1:39PMलातूर : प्रतिनिधी

लातूर जिल्ह्यातील गुबाळ शिवारातील निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्यात दोन महिलांचे  मृतदेह मंगळवारी आढळले. महिलांच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नसले तरी कालव्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा आहे.

आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गुबाळच्या गावकाऱ्यांना कालव्याच्या पाण्यात दोन महिलांचे मृतदेह तरंगताना दिसले. त्यानी याबाबत किल्लारी पोलीस ठाण्याला फोनवरून कळवले. त्यानंतर तेथील पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले. पंचनामा केल्यानंतर  मृतदेह उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा पोलिसांकडे पाठवण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक भोसले यांनी सांगितले. निम्न तेरणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पिकांसाठी पाणी सोडण्यात आले होते. याची कल्पना व घ्यावयाची खबरदारी याबाबत संबधित विभागाने लाभ छेत्रातील गावांना पूर्व सूचना दिली नसावी. या महिला पाण्यात वाहून गेल्या असाव्यात अशीही चर्चा होती.