होमपेज › Marathwada › चार हजारांची लाच स्वीकारतांना मुख्याध्यापकास अटक

चार हजारांची लाच स्वीकारतांना मुख्याध्यापकास अटक

Published On: Apr 12 2018 6:24PM | Last Updated: Apr 12 2018 6:24PMडोंगरकडा : प्रतिनिधी

कराटे बॉक्सींग प्रशिक्षकाच्या मानधनाचा धनादेश देण्यासाठी चार हजाराची लाच घेतांना कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकास एसीबीच्या पथकाने गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रंगेहाथ पकडले. 

डोंगरकडा येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून विजयकुमार जीवनराव केंद्रे हे कार्यरत आहे. त्यांच्या शाळेत कराटे बॉक्सींग प्रशिक्षक म्हणून विजय आडे (रा.वरूड तांडा ता.कळमनुरी) कार्यरत होते. त्यांच्या प्रशिक्षणापोटी असलले नऊ हजाराचे मानधन धनादेशाद्वारे देण्यासाठी स्वाक्षरी व प्रशिक्षण प्रमाणपत्र तसेच मुलींच्या हजेरी पटावर सह्या करण्याची मागणी मुख्याध्यापक केंद्रे यांच्याकडै केली असता, केंद्रे यांनी पाच हजाराच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी तडजोडीअंती चार हजार रूपये देण्याचे ठरविल्यानंतर आडे यांनी एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची 12 एप्रिल रोजी पडताळणी करून दुपारी साडेबाराच्या सुमारास शाळेत असलेल्या मुख्याध्यापकाच्या कक्षात प्रभारी मुख्याध्यापक विजयकुमार केंद्रे यास चार हजाराच्या लाचेची रक्‍कम स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस उपाधिक्षक सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील, शेख उमर, अभीमन्यू कांदे, संतोष दुमाने, ओमप्रकाश पंडीतकर, महारूद्र कबाडे, अविनाश किर्तनकार, आगलावे यांच्या पथकाने पार पाडली. सबंधित मुख्याध्यापकाविरोधात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.