Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Marathwada › केजमध्ये डाक्टरने केली आत्महत्या

केजमध्ये डाक्टरने केली आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

केज : प्रतिनिधी

केज शहरातील शुक्रवार पेठेत खाजगी दवाखाना चालवत असलेल्या डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. गणेश केशव कुलकर्णी( वय, ४० . रा. केजकर) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या डॉक्‍टरचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. 

केज येथील शुक्रवार पेठेत डॉ. गणेश कुलकर्णी हे खाजगी दवाखाना चालवत होते. शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत दवाखान्यात ओपीडी करत असतानाही ते तणावात असल्याचे नागरिकांनी सांगितले. सकाळी अकरा वाजता दवाखाना बंद करून ते वकीलवाडी केज येथील राहत्या घरी गेल्यानंतर त्यांनी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घरच्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे केजकर यांना मृत घोषित केले. 
गणेश केजकर यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

सायंकाळी बदलला व्हाटसपचा स्टेटस
गणेश केजकर यांनी सायंकाळी आत्महत्या करण्यापूर्वी I qut हा स्टेटस ठेवून आत्महत्या केली. त्यांच्या व्हाटसपचे लास्ट सीन ६ वाजून ४६ मिनिटे असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.