Wed, Feb 20, 2019 17:41होमपेज › Marathwada › लाचखोर डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

Published On: Jan 11 2018 4:43PM | Last Updated: Jan 11 2018 4:43PM

बुकमार्क करा
भंडारा : प्रतिनिधी 

भंडारा येथील शासकिय रुग्णालयातील डॉ. लक्ष्मण कृष्ण फेगळकर (नेत्र चिकित्सक) याने तक्रारदरास शस्त्रक्रियेसाठी ६००० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यांनतंर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबधंक विभाग भंडारा येथे तक्रार केली.

याविषयी दि.१० रोजी लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने सापळा रचला, व तडजोडीअंती डॉ.लक्ष्मण फेगळकर हा चार हजारांची लाच स्वीकारण्यास तयार झाला. त्यानंतर लाच स्वीकारताच क्षणी लाचलुचपत विभाने त्यांला रंगेहाथ पकडून अटक केली.

सदर कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय माहुलकर, लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा पोलिस उपअधीक्षक दिनकर सावरकर  यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी केली.