Thu, Aug 22, 2019 10:15होमपेज › Marathwada › जिल्ह्यातील शेतकरी तणावग्रस्तच

जिल्ह्यातील शेतकरी तणावग्रस्तच

Published On: Mar 18 2018 1:52AM | Last Updated: Mar 18 2018 1:52AMबीड : शिरीष शिंदे

दुष्काळ व नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने अनेक निकष पुढे करत कर्जमाफ ी दिली . राज्य शासनाने सुरू केलेल्या प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्व्हेनुसार मागील सहा महिन्यांत 3 हजार 28 शेतकरी तणावग्रस्त असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. डॉक्टरांनी सुमपदेशन केल्यानंतर तणावाखाली असलेल्या शेतकर्‍यांची स्थिती सुधारत आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखणे व त्यांच्या कुटुंबाला सर्वांगीण भक्कम आधार देत मनोधैर्य उंचावण्यासाठी  प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. बीड जिल्हा रुग्णालयांतर्गत या योजनेवर देखरेख व काम केले जात आहे. या योजनेत कर्जबाजारी, आर्थिक अडचणीतील शेतकर्‍यांचा तालुका किंवा गावातील आशा स्वयंसेविकेमार्फत शोध घेऊन समुपदेशन केले जाते. सार्वजनिक आरोग्य विभागाची मूळ संकल्पना असलेल्या या योजनेमध्ये महसूल विभागासह इतरही विभाग सहभागी आहेत. जिल्हा रुग्णालयात शेतकरी मित्र कक्ष स्थापन करण्यात आला असून तणावग्रस्त शेतकरी मार्गदर्शनासाठी 104 या क्रमांकावर मोफ त कॉल करू शकतात. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याकरिता डॉक्टर, वैद्यकीय मानसतज्ज्ञ, परिचारिका व अंगणवाडी सेविका यांची टीम असून ही टीम दर दोन आठवड्यांत जिल्ह्यातील  तालुक्यांमध्ये दौरे करून शेतकर्‍यांचे समुपदेशन करते.  शेतकरी कुटुंबांमध्ये असलेला आरोग्यावरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी त्यांना कुठल्या प्रकारच्या उपचारांची आवश्यकता आहे, त्यानुसार त्यांना सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. 

Tags : district, Farmer, suffer, tension, Beed news