Sun, Jul 12, 2020 23:33होमपेज › Marathwada › धुळ्यात आणखी पाच कोरोना रुग्णांची भर 

धुळ्यात आणखी पाच कोरोना रुग्णांची भर 

Last Updated: Jun 02 2020 10:30AM
धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून आता बाधितांचा आकडा १६७ वर गेला आहे. तर आज सकाळी शिरपूर येथील आणखी एका बाधिताचा मृत्यू झाल्याने शिरपूरमधील मयतांची संख्या ५ तर जिल्ह्यातील मयत रुग्णांची संख्या २० वर गेली आहे.

धुळे जिल्हयात बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रात्री उशीरा आलेल्या अहवालानुसार धुळे शहरातील स्वामी नारायण सोसायटीमधील पुरुष व आझादनगरातील पुरुषाचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. तर आज सकाळी आणखी तिघांना बाधा झाल्याचे आढळून आले आहे. यात फिरदौस नगर व जामचा मळा भागातील पुरुष तर भावसार कॉलनीतील महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता जिल्हयातील बाधितांची संख्या १६७ वर गेली असून धुळे शहरात १०७ बाधित झाले आहेत. 

सध्या शिरपुरमधे ३७, शिंदखेडयात ९, साक्रीत १० तर धुळे ग्रामीणमधे ४ बाधित आहेत. दरम्यान आज पहाटे शिरपूर मधील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिरपुरमधील मयतांचा आकडा पाच तर जिल्हयातील बळींची संख्या २० वर गेली आहे. आता पावेतो धुळे शहरात १०, धुळे ग्रामीणमधे एक, साक्रीमधे २, शिंदखेडयात दोन, मयत झाले आहेत.